यशस्वितेची मानसिकता | Mindset for success(Marathi)

यश संपादन करण्यासाठी नेमकी कोणती मानसिकता तयार कराल. कोणत्याही यशासाठी मानसिकता योग्य असणे फार महत्वाचे असते.

#1. कृती करण्यावर भर द्या

बऱ्याचदा आपण आयुष्यामध्ये एखाद्या Motivation ची वाट पाहत असतो. माझ्या आयुष्यामध्ये एखादी Motivational घटना घडेल आणि नंतर मी कामाला लागेल. मुळातच Motivation हे खूप महत्वाचे असे emotion आहे पण हे emotion तात्पुरते किंवा थोड्या वेळाकरता आपल्या सोबत असते. माझे असे मुळीच म्हणणे नाही कि आपण Motivation शोधू नये पण Motivational Psychology नुसार आपल्या कृती(Action) मधून भेटणारे Motivation दीर्घ काळ टिकून राहते. नेमकी यशस्वितेची मानसिकता विकसित करण्यासाठी हे महत्वाचे ठरू शकते.

आपण आपला बराच वेळ आणि ऊर्जा स्वतःला Motivate करण्यासाठी घालवतो. वास्तविकता हिच आहे कि कोणत्याही क्षेत्रामध्ये success मिळवण्यासाठी चिकाटीने(persistently) प्रयत्न करत राहणे आणि स्वतःचे अवलोकन (self-awareness) करत राहणे, हेच आहे. यशस्वितेची मानसिकता तयार करण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल असते.

खूपशी अशी पुस्तके आणि youtube videos आहेत ज्या मध्ये भरपूर succesful ideas आहेत. त्या करायला सोप्या पण असतात, पण आपण त्या प्रत्यक्षात करत नाही, एवढाच फरक असतो.

यशस्वितेची मानसिकता स्पष्ट होते तुमच्या प्रत्यक्ष कृती करण्याने.
यशस्वितेची मानसिकता स्पष्ट होते तुमच्या प्रत्यक्ष कृती करण्याने.

आतापर्यंत यशस्वी लोकांची मोठी स्वप्ने साध्य झाली, ती केवळ भव्य दृष्टिकोनातूनच नाही तर आता आपल्या समोर सर्वात महत्वाचे काय ते करण्याला प्राधान्य देण्याने. Steve Jobs च्या भव्य यशाकडे पाहुन जरा विचार करा कि, Jobs जर फक्त विचार करत बसला असता कि, “असे काय केले तर मी प्रसिद्ध आणि यशस्वी होईन?” त्यापेक्षा Steve Jobs ने लोकांच्या दैनंदिन समस्या जाणून घेऊन त्यावर प्रत्यक्षात काम करण्यावर भर दिला.

यशस्वी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात Inspiration येईल आणि मग आपण काम करू ह्याची वाट बघत बसत नाही. ते त्यांचे काम अखंड पणे न थांबता चालू ठेवतात.

#2. कायम आपणच बरोबर असू हा आग्रह सोडा

एखादा निर्णय घेत असताना तो बरोबर असावा हे सर्वांनाच वाटते. पण आपला निर्णय चुकूच नये किंवा निर्णय चुकलाच कसा हा आग्रह थोडा धोकादायक असतो. यशाकडे वाटचाल करत असताना असे बरेच निर्णय चुकणार आहेत आणि त्यातूनच आपण शिकणार असतो.

आपण आपल्या चुकांमधूनच खूप काही शिकत असतो. Photo by George Becker on Pexels.com

“स्वतःवरच्या विश्वासावर अविचारी पद्धतीने ठाम असणे” कि मी बरोबरच असणार आहे, हा विचार यशाच्या मार्गामध्ये अडथळा असू शकतो. आपल्याला हे शिकावे लागेल कि आपणहि चुकू शकतो. आपले काही निर्णय सुध्दा चुकू शकतात.

मुळातच यश(Success) हि काही एकदिवसीय संकल्पना नाही. आज यशस्वी झालो आणि उद्यापासून यश आपोआप टिकून राहील !! असे नाही. दीर्घ काळ टिकू शकेल अशा यशासाठीची मानसिकता बनवत असताना आपली निर्णय क्षमता महत्वाची असते. ‘कायम आपणच बरोबर/योग्य आहोत’ ह्यामुळे बळावत जाणारा अहंकार आपल्या निर्णय क्षमतेवर नकारात्मक परिणाम करू शकतो. परिणामी निर्णय चुकण्याची दाट शक्यता असते.

खरं सांगायचे झाले तर, आपण सर्व कोणत्या ना कोणत्या गोष्टीविषयी निश्चितच चुकीचे असू शकतो. आपण आपल्या चुकांमधून, आपल्या तर्कबुद्धीच्या जोरावर, आपल्या निरीक्षण क्षमतेतून बरेच काही शिकू शकतो. अगदी १००% बरोबर असण्यापेक्षा आपण कमीतकमी कसे चुकू शकतो, झालेल्या चुका कशा पद्धतीने स्वीकारू शकतो, नवनवीन कौशल्ये कसे शिकता येतील, स्वतःच्या क्षमता कशा वाढवू शकतो ह्या सर्वांवर आशावादी राहून प्रयत्न नक्कीच करू शकतो.

#3. यशाची खरी संकल्पना समजून घ्या

प्रत्येकाची यशाची संकल्पना वेगवेगळी असू शकते. आपल्या प्रत्येकाच्या यशस्वी होण्यासाठी बऱ्याच महत्वकांक्षा आणि ध्येय असू शकतात. इथे जर आपण “SUCCESS=X” असे पकडले तर काहीजणांना साठी X पैसा असू शकतो किंवा प्रसिद्धी किंवा सत्ता किंवा प्रतिष्ठा किंवा ह्या सर्वच गोष्टी किंवा आणखी काही.

आताही हे वाचत असताना आपण यशाची संकल्पना समजू शकलेलो नाहीये. आतापण आपण आपल्या समाजाने , कुटुंबाने, आपल्या सभोवतालच्या वातावरणाने ज्या काही Success च्या पूर्व-संकल्पना आपल्याला दिल्या आहेत त्यावरच आपण आपले यश मोजत असतो. मुळातच Successful म्हणजेच पैसा/प्रसिद्धी/प्रतिष्ठा यांचा तसा संबंध नाही. यशा कडे बघण्याचा दृष्टिकोन आपली मानसिकता तयार करत असते.

एकीकडे Bill Gates जो जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असताना, Microsoft चा पदभार सोडल्यावर समाजकार्यासाठी काम करतो. आर्थिक,सामाजिक,कौटुंबिक स्तरावर सर्व मिळवून सुद्धा आपण आणखी काहीतरी करू शकतो जे Bill Gates च्या मते यश असू शकते आणि ते त्याने केले. मानसशास्त्रामध्ये त्याला Self-actualization असे पण म्हणतात. दुसरीकडे बाबा आमटे यांनी आयुष्यभर कुष्ठरोगी लोकांची सेवा केली ज्याची दखल जागतिक पातळीवर देखील घेतली गेली. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नसून पण ते त्यांच्या कामात यशस्वी आहेत.

प्रत्येकाचे यश मोजण्याचे किंवा मानण्याचे मापदंड वेगळे असू शकतात आणि तेच जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

#4. लक्षात ठेवा! तुमच्याकडे पर्याय असतात

तुमचा जन्म कुठे होईल, कसा होईल, तुमची सुरुवातीची शारीरिक,मानसिक आणि आर्थिक स्थिती कशी असेन हे सर्व तुमच्या हातात नसते पण हि आपली जबाबदारी असते कि नंतर त्यातून मार्ग काढत पुढे जायचे. Carol Dweck ह्या प्रसिद्ध लेखिकेच्या Mindset ह्या पुस्तकामध्ये त्यांनी Growth Mindset चा उल्लेख केला आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या क्षमता योग्य मार्गदर्शन, शिक्षण आणि चिकाटीने वाढवू शकता.

ह्याच्याच विरुद्ध, Fixed Mindset ज्यामध्ये आपली मूळ धारणा अशी असते कि आपल्या मूलभूत क्षमता, बुद्धिमत्ता आणि कौशल्य न बदलू शकणारी असतात.

आपल्यामध्ये जन्मजात काही कौशल्ये आहे पण जर यशा कडे वाटचाल करण्यासाठी ती पुरेशी नसतील तर Growth Mindset ची संकल्पना समजून घेऊन आपण आपल्या बऱ्याच क्षमता निश्चितच विकसित करू शकतो.

Fixed Mindset

लवकर माघार घेणे

आव्हानांपासून दूर पळणे

प्रयत्नांचे महत्व नसणे

उपयुक्त नकारात्मक अभिप्रायांकडे दुर्लक्ष करणे

इतरांच्या यशाने आपल्याला धोका वाटणे

Growth Mindset

अडचणींवर मात करणे.

आव्हाने स्वीकारणे

यशासाठी प्रयत्न हाच मार्ग असतो

नकारात्मक अभिप्रायांपासून शिकणे

इतरांच्या यशाने प्रेरणा घेणे आणि त्यातून शिकणे.

तात्पर्य, Growth Mindset मुळे यशाची नवनवीन उंची गाठणे शक्य होते.

वाचा : Growth Mindset म्हणजे काय आणि तो कसा विकसित कराल ?

एकंदरीतच आपल्या कारकिर्दीमध्ये आपण यशस्वी होत नाही, तर आपल्या समोरचे सर्व पर्याय संपतात असे नाही. यशस्वितेची मानसिकता विकसित करून आपण आपल्या पुढील आव्हानांवर मात करायला नक्कीच शिकता येईन.

Article credits.

  1. Inspired by the work of Mark Manson and Carol Dweck.
  2. https://markmanson.net/5-mindsets-that-create-success

6 responses to “यशस्वितेची मानसिकता | Mindset for success(Marathi)”

  1. Amazing Artical

  2. Very nice !!

  3. खूपच छान लेख आहे. आपल्यातील चांगले गुण कसे वाढवावेत यासाठी हा लेख खूप प्रोत्साहित करतो.

  4. खुप छान लिहिले आहे. प्रत्येक मुद्दा छान बारीक विचार करुन मांडला आहे.

  5. अतिशय सुंदर लेखन बऱ्याचश्या गोष्टी रीलेट करतात, पुढील लेखनास शुभेच्छा

  6. Nice one

Leave a Reply

Discover more from © 2025 Rohit Deshmukh. All rights reserved.

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading